Guestbook
Extremely innovative. This is unique exhibition. I have not seen any nail pantings before. मंत्री महोदय series is my favourite and Ganesh Series. With Love
Ompuri, noted actor.
निर्जीव नखातून सजीव कला, वा क्या बात है?
नयन बा. नगरकर
'नखांजली' नावातच कला आणि कलेतून किरण बरसतो!
सुंदर, अप्रतिम शब्द जिथे थिटे पडावेत. यापुढील कार्यास मनापासून शुभेच्छा!
अँड. मुजुषा मंदार गुर्जर, नाशिक
कला व हस्तकला याचे एकत्रीत मिश्रण. अतिशय उत्कृष्ट रित्या केलेले आहे.
अशीच कला आपण जोपासा व इतरांना त्याचे प्रशिक्षण देऊन त्याच्या कलेचा विकास करा. Best of Luck in your future.
श्री. धनराज रघुनाथ राऊत
३५ वर्षे नखचित्रकलेची तपश्चर्या करणार्या कलाकार किरण जगताप यांनी
बालकांसह मोठयांनाही प्रदर्शनाद्वारे मोहित केले आहे. त्यांची साधना चित्रांमधून व्यक्त होते.
या आगळया वेगळया कलेच्या 'नखांची सर' इतरांना येणे अवघड. लवकरच वर्कशॉप घेऊन नाशकात
अनेक नखचित्रकार निर्माण करावे ही शुभेच्छा.
संजय देवधर
प्रिय निर्माता, प्रिय मित्रा, तुझा आम्हाला अभिमान आहे.
आगे बढो......आम्ही सर्व तुझ्या सोबत आहोत......
संजय मुंदडा
मी जे पाहिले तो दैवी चमत्कार समजतो. मनपुर्वक शुभूच्छा!
रेणापूरकर एम.के.
कलेबद्दल लिहावं तेवढं थोडच असते. मी तेवढेच म्हणू शकतो की एक आगळी वेगळी शैली निर्माण केली आहे.
त्यामुळे पाहण्यात एक गंमत वाटते. आपली चित्रे मनापासून आवडली!
प्रफुल्ल चव्हाण
'मुर्ती लहान परी किर्ती महान'
किरण जगताप यांच्या कलेस सादर प्रणाम!
श्रीकांत बारटक्के
चुम लू आपके नखोंको!
अभिजित कदम
आज पहिली बार मैने नखचित्रण देखा है और नख की साह्यतासे भी कारे चित्र बनाया जा सकता है।
यह मैने देखा सचमुच आपकी यह कला ज्येष्ठ और गौरवनिय है।
बल्लु जगताप
आपली कल्पना व आपल्या कलेचे करावे तेवढे कौतुक अपुरेच होय. पण आपले प्रदर्शन शाळा/कॉलेज यामध्येही भरावावे
व यातुनच एखाद्याला चित्राविषयी उत्तम प्रेरणा मिळुन आपल्यासारखा हाडांचा चित्रकार निश्चितच बनेल.
हेमंत शास्त्री
इवल्याश्या बोटांच्या नखाने केलेली कलेच्या क्षेत्रात फारच मोठी किमया
जी. किरण
पांडवांनी कोरले पत्थर ,
जगतापांनी कोरले पेपर!
अरुण होते
प्रिय किरण,
परमेश्वराने तुमच्यात प्राण ओतले, तुम्ही कलेत ओतले,
ईश्वराने दिल्याने सुंदर जीवनाचा पुरेपुर फायदा झाला,
ईश्वराने जीवन देऊन व तुमचे कलाप्रेम देऊन 'सार्थक' झाले.
आनंदी जीवनासाठी व भरभराटीसाठी शुभेच्छा!
जितेंद्र चिमणपूर
मुली नखे वाढवतात मुलांना चिमटे घेण्यासाठी,
कुणी नखे खातात. तुमचा हा उपयोग फार अप्रतिम आहे.
वाह-नखों में भी क्या ताकद है।
ईश्वराने माणसाला पूर्वी शेपूट दिले होते. वापर न झाल्याने ते आता नाही. तदवतच ''नंख'' ही वापरात न येणारी बाब. हळूहळू तीही कमी होतील.
परंतू ''किरण जगताप'' ह्यांच्या नखांचा अविष्कार पाहाता ईश्वराने दिलेल्या ''नख'' रुपी दिव्याला पैलू पाडले असतील ते किरणनेच!!
हार्दीक शुभेच्छा
गिरीश चिटणीस
प्रदर्शन पाहिले. एक उत्कृष्ट कलेचा अविष्कार.
पुढील आयुष्याबद्दल अनेक सदिच्छा
डॉ. सौ. सरल प्र. धारणकर
तुमच्या नखाच्या कलेला कसली तरी सर आहे.
ती पाहून कळत नाही, ती प्रत्यक्षात अजून सरस वाटते.
डौ. सुभाष जुनागडे
आजवर बरेच कलेचे प्रकार बघितले परंतु हा छंद अथवा कला कहीही म्हणा पण अफलातुन हं!
प्रविण भामरे
किरण-नखांची
बघुनी किमया
स्तिमित झालो
चित्र जगी या
श्रीराम वैजापूरकर
There is no bondries for art it is natural gift of God. But there is need a eye to know the art.
- Jagadish K
Congragulations for your lovely God given unique art. May God bless you & your family always excellent work.
Margaret Sokomon
Fravashi Academy
The exibhition is mind blowing & Fantastic
Sailnder Salavi
चित्रे तर सगळेच काढतात परंतू नखांची ही कला प्रथमच बघितली जर आपण ती दुसर्यांनाही शिकविली तर फारच छान होईल.
सौ.रेखा मंचरकर
नखांजली ही कला अतिशय अवघड असतांना आपण काढलेली चित्रे इतकी अप्रतिम रीतीने काढली की कुणी ते पेन्सिलने सुध्दा काढू शकत नाही. ही कला आपण मुलानांही शिकवावी. आपले हार्दिक अभिनंदन
आर. वाघ
श्री. जगताप सर आपण जी चित्र काढली आहेत. ती अतिशय सुंदर आहेतच तुम्हाला ही देवाने दिलेली मोठी देणगीच आहे. ह्या कलेचा वारसा आम्हाला मिळाल्यावर आम्ही आपले आभारी राहु.
सौ. निलीमा पाठक
अप्रतिम!!!
लाखात काय पण एखाद्या कोटी लोकसंख्येत एखाद्यालाच मिळणारी ही नखातून चित्र साकारण्याची कला एकमेव आहे. ह्याला अप्रतिम हा शब्द सुध्दा थिटा वाटतो. किरण तुला मिळालेली ही दैवी देणगी अगदी ग्रीनिज बुकात नोंदली जाण्याच्या पात्रतेची आहे. त्याकरिता मी , खूप खूप शुभेच्छा देते.
डॉ. निशिगंधा मोगल
नखांजली पाहिली व प्रात्यक्षिकही करून दाखविली, उपक्रम स्तुत्य आहे. व्यक्ती चित्रे फारच उत्तम आहेत. शुभाशिर्वाद व आपली उत्तरोत्तर प्रगती होवो.
डौ. कृ.भा.आपटे
शुद्र समजून कापून फेकणार्या नखांचा तुम्ही अप्रतिम उपयोग केला आहे. ते पाहून आम्ही थक्क झालो. तुमच्या अंगी असलेल्या या कलेचा खूप विकास होवो आणि तुमच्यासारखे कलाकार भारताला मिळाले आहेत आणि अजून मिळावेत ही ईश्वर चरणी प्रार्थना. तुमच्या ह्या उपक्रमाला आम्हा सर्वांकडून शुभेच्छा!
पुनम बार्हाटे, माधुरी बार्हाटे, पुनम चौधरी
किरण जगताप यांचे नखांजली हे प्रदर्शन विशेषत: विद्यार्थ्यांना प्रेरणादायक व मार्गदर्शक ठरावे यासाठी तसेच किरण जगताप यांच्या या अवघड कला अविष्कारास हार्दिक सदिच्छा!
वि. जाधव , माजी मुख्याध्यापक-पेठे विद्यालय
अप्रतिम सुंदर! हे प्रदर्शन बघताना प्रत्येक चित्रा मागे घेतलेले कष्ट, परिश्रम, चिकाटी जाणवते तसेच मुलांना प्रात्यक्षिक दाखवून, शिकवून पुढील पिढीकडे ही कला देण्याचं 'सराचं मोठे मन' ही त्यातून जाणवते आपली ही कला दिवसेंदिवस वृध्दिंगत व्हावी व भावी पिढीला याचा लाभ मिळावा हीच सदिच्छा!
सौ. वैशाली मईंद (माई लेले शाळा)
'नखं' निर्जिव असा शरीराचा भाग निरूपयोगी म्हणून वारंवार कापला जाणारा पण त्यालाही सुंदर-मोहक सजीवपणा देण्याची जादू आपण करून दाखवली आहे.
आपली ही जादूई कमाल बघतांना भान हरपते. आपण विविध विषय हाताळले आहेत. त्यात मन वेधून घेतात ते नानाविध पक्षांचे डौलदार आकार.
कागदालाही सजीव बनविणारी ही आपल्या नखांची जादू अशीच बहरु दे. या नवीन क्षेत्रात आपल्याला असेच यश मिळो, ही सदिच्छा.
सौ. जोशी वि.ना.
प्रिय किरण
एकदा पाहिल्यानंतर परत परत मनाला मोहून टाकणारी कलाकृती बघून मन आनंदीत झाले. तुझ्या कलेला 'भारत' देशात प्रसिध्दी मिळो हीच शुभेच्छा.
देवेंद्र कडवे-मनमाड
प्रदर्शन फारच छान आहे. एक वेगळच तंत्र उपयोगात आणून निरनिराळया विषयांवर खूपच छान चित्रे चितारली आहेत. प्रदर्शन पाहून एक चांगल्या प्रकारचा आनंद मिळाला. उत्तरोत्तर आपली प्रगती होत जावो ही शुभेच्छा!
श्री. राणे एस.ए-अधेंरी , मुंबई
प्रदर्शन पाहून फारच आश्चर्य वाटलं कारण आत्तापर्यंत किती तरी कलावंत आम्ही पाहिले पण २७ वर्षात पहिल्यांदा नखांजली प्रदर्शन पाहण्याचा योग आला. किरण जगतापची नखांजली चित्रे पाहून आश्चर्य वाटलं आमच्या त्यांना शुभेच्छा!
चंद्रकांत मधुकर परब-सातांक्रुझ , मुंबई
आपल्या नखांत मला देवाचे एक रूप दिसते आहे.
प्रभु रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमित आपण जन्मास येऊन आपली कला जोपासली याचा अभिमान व गर्व या शहरास आहे. आपली कला काळाच्या औधात वृदिंगत व्होवो हीच अपेक्षा
सतिश थोंडगे (राष्ट्रीय खेळाडू)
।। नखश्री।।
किरण सर
बघितला यशाचा डोंगर
धरीला नखांचा वखर
पकडूनी कागदाची कपार
कागदासी दिला चित्राचा आकार
स्वप्न केले स्वत:चे साकार
यश मिळाले जगी तुज अपार
महिमा नखांचा आहे अपरंपार
चित्रांची चादर, केली सादर, यशाचा आहे आधार
नखांचा प्रहार, करी कागदावर, कायम यश मिळो अपार
के.एस. गोसावी,
शिवरे-निफाड
"Really it is Splendid Creative Expression"